gmc aurangabad recruitment 2025 छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने गट-ड (वर्ग-4) आणि इतर संवर्गातील एकूण 357 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे
पदांचा तपशील:
ही भरती दोन वेगवेगळ्या संस्थांअंतर्गत होत आहे:
१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC): एकूण 57 पदे
* पदे: चतुर्थश्रेणी कर्मचारी, आया, माळी, प्रयोगशाळा परिचर.
२. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMCH): एकूण 300 पदे
* पदे: चतुर्थश्रेणी कर्मचारी, दाया, बॉयलर चालक, पाणक्या, ड्रेसर, माळी, नाभिक.
महत्वाच्या तारखा: gmc aurangabad recruitment 2025
- ऑनलाईन अर्ज सुरू: 05 जून 2025 (सायंकाळी 5:00 वाजल्यापासून)
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2025 (सायंकाळी 5 :00 वाजेपर्यंत)
- परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 24 जून 2025 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
अर्ज कसा कराल आणि शुल्क किती?
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज फक्त www.gmcaurangabad.com या अधिकृत संकेतस्थळावर (website) ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग (Open Category): ₹ 1000/-
- राखीव प्रवर्ग (Reserved Category): ₹ 900/-
- माजी सैनिक: शुल्क नाही
परीक्षेची तारीख आणि वेळ नंतर संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.